Thursday, May 2, 2024
Homeधुळेमेहेरगावातील वादाला सामुहीक बहिष्काराचे वळण

मेहेरगावातील वादाला सामुहीक बहिष्काराचे वळण

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील मेहेरगाव (Mehergaon) येथे पोळ्याच्या दिवशी (day of the hive) झालेल्या वादाला वेगळेच वळण लागले (different twist to the debate) आहे. गावातील दलित समाजावर सामुहीक बहिष्कार (Mass boycott) टाकण्याचा निर्णय होवून यासंदर्भात ऑडीओक्लीप राज्यभर व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासन (District Administration) खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांनी गावात भेट देवून दोन्ही गटांची समजूत घातली. सध्यातरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -

पोळ्याच्या दिवशी सजविलेले बैल फिरविण्यावरुन काही तरुणांमध्ये वाद झालेत. वादाचे पर्यावरसन हाणामारीत होवून या वादाला दलित-संवर्ण असे स्वरुप प्राप्त झाले. त्यामुळे एकाबाजुने गावातील 10 जणांविरुध्द अ‍ॅक्ट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्‍या बाजुनेही काही जणांवर भादंवि 395 अन्वये गुन्हा दाखल झाला. यामुळे दोन्ही गटातील धुसफूस आणखीच वाढली.

बाहेरच्यांचा हस्तक्षेप

गावातील वाद पहिल्याच दिवशी सरपंचासह इतरांनी समजूत घालून आपसात मिटविला असतांना धुळ्यातील काही जणांनी या वादात हस्तक्षेप केल्याचा एका गटाचा आरोप आहे. यामुळेच हा वाद जास्त चिथविला गेला. परिणामी एका गटाने गावभर फिरुन सामुहीक शिवीगाळ केली. तर दुसर्‍या गटाने गावात बैठक घेवून त्यांच्याशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला.

सामुहीक बहिष्कार कलंकच

जिल्हा पोलीस प्रमुख प्रविण पाटील यांना आज एका शिष्टमंडळाने निवेदन देवून चर्चा केली. निवेदनात म्हटले ओह की, मेहेरगावात यापुर्वी अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरुन वाद झालेले असतांना देखील सामुहीक बहिष्कारापर्यंतची वेळ कधी आली नाही. मात्र पोळ्याच्या दिवशी जाणीवपूर्वक दलित तरुणांना अडवून बैल मिरवणूक घेवून जावु नका असे व्देष भावनेतून व जातीवादी मानसिकतेतून सांगण्यात आले. यातूनच लाठ्या-काठ्या व लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर संवर्ण समाजाने गांधी चौकात बैठक घेवून दलित समाजाशी संबंध तोडण्याचा तसेच त्यांना किराणा देवू नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, नाभिक समाजाने त्यांची दाढी, कटींग करु नये असा निर्णय घेतला.

जो व्यावसायीक दलित समाजाला मदत करेल त्याला चौकात आणून मारहाण करायची व त्यास रोख स्वरुपाचा दंड आकारायचा असाही सामुहीक निर्णय झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. दलित समाजावर सामुहीक बहिष्कार टाकणे हा पुरोगामी महाराष्ट्राला कलंकच म्हणावा लागेल. अ‍ॅक्ट्रॉसिटी कायद्याला शह देण्यासाठी जाणीवपूर्वक कलम 395 अन्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तो मागे घ्यावा अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी अ‍ॅड.संतोष जाधव, राज चव्हाण, प्रवीण साळवे, आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, मंगेश जगताप, संजय बैसाणे, रामकृष्ण नेरकर, देवेंद्र बनसोडे, प्रेम अहिरे, भैय्या वाघ यांच्यासह कार्यकर्ते व महिला पुरुष उपस्थित होते.

अधिकार्‍यांची भेट

दलित समाजातील एका तरुणाने नाभिक दुकानदाराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून केलेल्या संवादाची ऑडीओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. किराणा दुकानदार आणि शेतीसंदर्भातही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. यात गावकर्‍यांचा सामुहीक निर्णय झाला असून तुम्हाला सहकार्य न करण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा आम्हाला मारहाण केली जाईल. आम्ही कोणतीही वस्तू देवू शकत नाही. कारण आम्हाला गावात रहायचे आहे, अशा अर्थाचा संवाद व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस प्रमुख प्रविण पाटील यांनी फौजफाट्यासह यांनी दुपारी गावात भेट दिली. दोन्ही गटाची समजूत घालून बहिष्कारासारखे प्रकार करु नये, असे सांगितले. दुपारनंतर सरपंच महेंद्र भामरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्यासह काही जबाबदार नागरिकांनी गावात प्रत्यक्ष फिरुन व्यावसायीकांना आवाहन करीत आपापले व्यवहार सुरु ठेवण्याचे आणि दलित समाजालाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. सध्या व्यवहार पुर्ववत असले तरीही गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.

बहिष्कार नव्हताच, अर्थाचा झाला अनर्थ

सार्वजनिक सण-उत्सव आले की, थोडेफार किरकोळ वाद होत असतात. पोळ्याच्या दिवशी मेहेरगावात काही तरुणांमध्ये असेच किरकोळ वाद झालेत. या वादाला दोन वर्षापुर्वी घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी होती. परंतु या वादाचे पर्यावसान परवा हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या प्रमुखांनी आपआपसात समजुत काढून हा वाद मिटविला होता. असे असतांना दलित समाजातील काहींनी या वादाच्या व्हीडीओ क्लिप व्हायरल करुन आपल्यावर अन्याय होत असल्याचे भासवत धुळ्यातील काही जणांशी संपर्क साधला.

बाहेरच्या मंडळींनी चिथविल्यामुळेच प्रकरण गुन्हे दाखल करेपर्यंत पोहचले. सध्या दोन्ही गटातील तापलेले वातावरण बघून आम्ही बैठक घेवून परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत जास्त संपर्क न ठेवण्याचे गावकर्‍यांना सांगितले. कारण संपर्कातून पुन्हा वादाची ठिणगी पडू शकते. परंतु शब्दाचा विपर्यास करुन आणि अर्थाचा अनर्थ करुन, संपर्क नाही याचा अर्थ बहिष्कारच.. असे हेतुतः पसरविण्यात आले.

तशा ऑडीओ क्लिपही जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आल्या. वास्तविक गावात बहिष्कार नव्हताच. आजपर्यंत कधी असे झालेलेही नाही. राज्यभर क्लिप व्हायरल झाल्यामुळेच बहिष्काराच्या अर्थाने हे प्रकरण चर्चेत आले.

खरेतर सरपंच आणि आम्ही स्वतः गावात फिरुन व्यावसायीकांना आवाहन करीत व्यवहार सुरु ठेवण्याचे सांगितले, अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील यांनी दै.देशदूतशी बोलतांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या