Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याMonsoon Update : राज्यात पुढील ५ दिवस कोसळणार धो-धो पाऊस; हवामान विभागाचा...

Monsoon Update : राज्यात पुढील ५ दिवस कोसळणार धो-धो पाऊस; हवामान विभागाचा अंदाज, नाशिकमध्ये कधी?

मुंबई | Mumbai

जून महिना संपत आला तरी मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकरी (Farmer) शेतीच्या पेरण्या रखडल्याने तर सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. त्यानंतर आज पहाटे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगरांसह महाराष्ट्रातील इतर भागांत पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

- Advertisement -

अशातच आता पुढील ५ दिवसांत मान्सून राज्यातील बहुतांश भागात सक्रिय होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर (K.S.Hosalikar) यांनी ट्वीट करून दिली आहे. के. एस. होसाळीकर यांनी या ट्वीटमध्ये मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून (Mumbai Colaba Observatory) जारी करण्यात आलेला तक्ता शेअर केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, सत्तेसाठी… Nashik Rain Update : त्र्यंबकसह ग्रामीण भागात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा

त्यानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कधी आणि किती प्रमाणात पाऊस पडेल, याविषयीचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. होसाळीकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोकण व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात (Nashik District) देखील मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात सुद्धा पावसाचा जोर असेल, असेही वेधशाळेने म्हटले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, आज रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबईत २६ ते २८ जून या दिवसांत अती मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तीन दिवस या शहरांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २५ ते २८ जून या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आंनदाची बातमी! शासकीय महापूजेत विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या