Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रWeather Forecast : आजही मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईत यलो अलर्ट तर 'या'...

Weather Forecast : आजही मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईत यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यात पावसाने जोर पकडला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहेत. (Weather Forecast) काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं.

- Advertisement -

दरम्यान, आजही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पश्चिम घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या