Tuesday, January 27, 2026
Homeदेश विदेशनेपाळ बांगलादेशनंतर आता मेक्सिकोत Gen-Z रस्त्यावर; हजारोंच्या संख्येत तरुण रस्त्यावर का उतरले?...

नेपाळ बांगलादेशनंतर आता मेक्सिकोत Gen-Z रस्त्यावर; हजारोंच्या संख्येत तरुण रस्त्यावर का उतरले? काय कारण आहे?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेश व नेपाळमध्ये झालेले तरुणांचे आंदोलन (जेन-झी आंदोलन) आणि त्यातून झालेले सत्तांतराचे उदाहरण ताजे असतानाच आता अमेरिकेच्या शेजारी असलेल्या मेक्सिकोत तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी (१५ नोव्हेंबर) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो लोक जमले. हातात फलक, चेहऱ्यावर संताप आणि वेगवेगळ्या घोषणा देत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

मेक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा GenZ ने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्जशी संबंधित हिंसाचार आणि राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या सुरक्षा धोरणांविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत. याविरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले. जेन-झी तरूणांनी यावेळी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये हिंसक झडप झाली. याचे वेगवेगळे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

मेक्सिको सिटीमधील नॅशनल पॅलेसच्या बाहेर आंदोलन जमले. तिथे शीनबॉम राहतात आणि त्यांचे कार्यालयही आहे. या पॅलेससाठीच्या संरक्षणासाठी उभारलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी तोडले. कॅम्पसमध्ये सुरक्षा पुरवणाऱ्या पोलिसांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अग्निशामक यंत्रांचा वापर केला. काही आंदोलकांनी घोषणाबाजीही केली. त्यानंतर काही आंदोलकांनी थेट पोलीसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. “कार्लोस मांझोचे अशा प्रकारे संरक्षण करायला हवे होते,” अशा घोषणा तरूणांनी दिल्या.

YouTube video player

या आंदोलनात सहभागी झालेल्या काही नेत्यांनी म्हंटले आहे की, “आम्हाला आमच्या देशात सुरक्षा हवी आहे. देश अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त व्हावा, भ्रष्टाचारापासून आपली सुटका व्हावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.” समुद्री चाच्यांच्या झेंडा (कवटी व तलवारीचं चित्र असलेला काळा झेंडा) घेऊन मास्सा या आंदोलनात सहभागी झाले होते. हा झेंडा आता मेक्सिकोमधील जेन-झी आंदोलनाचा झेंडा बनला आहे.

ऑक्टोबर २०२४ पासून सत्तेत असलेल्या शीनबॉम यांनी त्यांच्या पहिल्या वर्षात ७० टक्क्यांहून अधिक लोकप्रियता रेटिंग कायम ठेवली, परंतु त्यांच्या सुरक्षा धोरणाबद्दल त्यांना टीकेचा सामना करावा लागला. विशेषतः मिचोआकान राज्यात झालेल्या हाय-प्रोफाइल हत्याकांडानंतर हा वाद उफाळला. आता आंदोलनात “आम्ही सारे कार्लोस मांझो” असे संदेश असलेले बॅनर आणि “वन पीस”मधील समुद्री चाच्यांचे झेंडे देखील दिसू लागले आहेत, जे जागतिक युवा चळवळींचे प्रतीक बनले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Crime News : लग्नात ५० तोळे सोनं, गाडी घेण्यासाठी २५ लाख...

0
पुणे | Pune पुणे जिल्ह्यातील (Pune District) उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.दीप्ती मगर-चौधरी (Deepti...