Thursday, May 9, 2024
HomeजळगावBreaking # दूध संघ अपहारप्रकरण : जबाबदार पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांवर गुन्हा

Breaking # दूध संघ अपहारप्रकरण : जबाबदार पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांवर गुन्हा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघात (District Milk Union) जबाबदार असलेल्यांनी (responsible) संगणमत करुन तसेच कट कारस्थान रचून (Conspiracy as well as conspiracy) आणि खोटे दस्ताऐवज (false documents) तयार करुन 1 कोटी 15 लाखांचा अपहार (embezzlement) केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात (police station) दाखल झालेल्या दोघ तक्रारींची चौकशी (Investigation of complaints) करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास दूध उत्पादक संघ (Milk Producers Union) व शासनाची फसवणूक (Cheating the government) केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात (City police station) अपहाराचा (case of embezzlement) गुन्हा (registered) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातून 14 टन बटर (लोणी) व 8 ते 9 टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पाऊडर) अशा एकूण दोन ते अडीच कोटी रुपयांच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्ररी आ. मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधिकक्षकांकडे केली होती. तसेच या मालाची विल्हेवाट दूध संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक व काही मोजकेच कर्मचार्‍यांनी अत्यंत हुशारीने व नियोजन पद्धतीने केली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

त्यानंतर दि. 12 ऑक्टोंबर रोजी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, दूध संघावर संचालक मंडळाचे नियंत्रण असून त्यांच्यावर संपुर्ण संघाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले होते.

कार्यकारी संचालक लिमये यांनी दि. 8 ऑक्टोंबर रोजी संदीप झाडे, स्वप्निल जाधव, नितीन पाटील, महेंद्र केदार यांना विक्री विभागातील लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले होते. त्यांना दि. 2 रोजी 14 टन लोणी संघाच्या बाहेर वाई जि. सातारा येथे शितगृहात पाठविल्याची नोंद घेतली आहे.

मात्र प्रत्यक्षात वाहन दूध संघाच्या बाहेरच गेले नसल्याची कुठलीही नोंद गेटवरील रजिष्टर मध्ये नव्हती. दरम्यान, पथकास अभिलेखानुसार 9 मेट्रीक टन दूध पावडरची देखील तफावत आढळून आल्याचे लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

संचालकांच्या आदेशात अपहाराची नोंद

दूध संघाबाबत दाखल झालेल्या तिनही तक्रारींची चौकशी केल्यानंतर तसेच कार्यकारी संचालकांनी काढलेल्या निलंबन आदेशानुसार अनंत अशोक अंबीकार, महेंद नारायण केदार यांनी नियंत्रणात असलेल्या यंत्रणेत गैरव्यवहार व अफरातफर करीत खोट्या नोंदी केल्याचे समोर आले आहे. म्हणून त्यांना दि. 11 ऑक्टोंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. दूध संघाने काढलेल्या आदेशात गैरव्यवहार व अफरातफर अल्याचे नमूद केले होते.

भल्या पहाटे गुन्हा दाखल

पोलिसांनी तक्रारींची चौकशी केल्यानंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात एकूण 1 कोटी 15 लाखांचा अपहार दि. 8 ऑक्टोंबर पुर्वी झाला आहे. तो अपहार दूध संघातील सर्व जबाबदार संबंधितांनी संगणमत करुन व कट कारस्थान रचून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप परदेशी यांनी सोमवारी पहाटे तक्रार देवून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा हे करीत आहे.

अपहार नव्हे तर चोरी

कार्यकारी संचालक लिमये यांनी दि. 12 रोजी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये अपहार झाल्याचे सांगितले. परंतु त्यांना ते मान्य नसल्याने दि. 13 रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या नावाने लेखी फिर्याद देवून अपहार नसून चोरी झाल्याचे नमूद केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या