Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yoaja: लाडकी बहिणबाबत मोठी अपडेट! सरकार रक्षाबंधन गिफ्टचे ३ हजार...

Ladki Bahin Yoaja: लाडकी बहिणबाबत मोठी अपडेट! सरकार रक्षाबंधन गिफ्टचे ३ हजार ऐवजी एवढी रक्कम देणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई | Mumbai
राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. यासंदर्भात महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 महिन्यांचा हफ्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट 3 हजार रुपये मिळाले होते. मात्र, यंदा एकच हफ्ता मिळणार आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली असून त्या म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आदिती तटकरे यांनी सांगितले की, पुढील १५ दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेच्या हफ्त्यासंदर्भात माहिती दिली होती.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...