Friday, May 3, 2024
Homeनगरयुवती आत्महत्या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे करावा - ना. आठवले

युवती आत्महत्या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे करावा – ना. आठवले

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील सरकारमध्ये लफडेबाजी करणारे बरेच लोक असल्याने सरकारची इमेज खराब होत चालली आहे.

- Advertisement -

पुण्यातील युवतीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास निपक्षपाती व्हावा आणि त्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत केली.

दि. 25 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्यावतीने देशभर भुमीमुक्ती आंदोलन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सकाळी शिर्डीत पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, दिपक गायकवाड, श्रावण वाघमारे, कैलास शेजवळ, सुरेंद्र थोरात, सुनील साळवे, रमेश गायकवाड, चांगदेव जगताप, दिलीप बनसोडे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना. आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यासारखेच आहे. शिवसेनेवर अशा प्रकारचा दबाव असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा प्रस्ताव आहे की बँक टु पॅव्हेलीयन, परत आमच्या सोबत या, अजुनही वेळ गेलेली नसल्याचे सांगत एक वर्ष आपण मुख्यमंत्रीपदी राहावे आणि उर्वरित तीन वर्ष देवेंद्र फडणवीस यांना द्यावे.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन साकार होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला भाजपासोबतच यावे लागेल. करोनाचा काळ सोडला तर शेतकर्‍यांचे कर्ज माफ होऊ शकले नाही. मागील पाच वर्षे शिवसेना सत्तेत असतांना उद्धव ठाकरे नेहमी बोलत होते की शेतकर्‍यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे, त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता पुर्ण नव्हती आता मात्र त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद मिळून सव्वा वर्ष झालेले आहे तरीदेखील शेतकर्‍यांचा सात बारा कोरा झालेला नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असताना त्यांना फ्लाईटमधून खाली उतरून दिले आहे. फ्लाईट काय सरकारची जहागिरी नाही, असे ना. आठवले यांनी ठणकावत राज्यपालांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान असून राज्यपालांना जर विमान वापरता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी देखील ते वापरू नये.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकारांवर कामात अडथळा आणला म्हणून पत्रकारांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे ही गोष्ट योग्य नाही. पत्रकारांना स्वातंत्र्य आहे. पत्रकारांशी संवाद साधून एखादा विषय सामंजस्याने सोडवला पाहिजे, परंतु त्या विषयाला वेगळे रुप देता कामा नये, त्यामुळे पत्रकारांवर अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे ना. आठवले यांनी बोलून दाखवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या