Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयChhagan Bhujbal : "त्यांच्याकडे आता कुणी..., शांतता रॅलीत फक्त..."; भुजबळांची मनोज जरांगेंवर...

Chhagan Bhujbal : “त्यांच्याकडे आता कुणी…, शांतता रॅलीत फक्त…”; भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्यभरात काढलेल्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये (Nashik) समारोप झाला. या समारोपाच्या भाषणात बोलतांना जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. तसेच छगन भुजबळ ‘अपशकुनी’ असून ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे वाटोळे होते, असे म्हणत जरांगेंनी भुजबळांना टोला लगावला होता. त्यानंतर आज मंत्री भुजबळ यांनी जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ते येवल्यात माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ajit Pawar : भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे; महायुतीमध्ये वादाची ठिणगी?

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “नाशिक येथील शांतता रॅलीत (Shantata Rally) पाच लाख मराठा बांधव येणार, असे काही लोकांनी म्हटले होते. इतके लोक शहरात आले तर नाशिक (Nashik) बंद पडेल. पण प्रत्यक्षात पाच लाख नाही तर फक्त ८ हजार लोकचं रॅलीत सहभागी झाले होते असा पोलिसांचा (Police) रिपोर्ट आहे. या रॅलीत अनेकजण शिव्या देत होते. काय त्यांची संस्कृती आणि घाणेरडे उच्चार. सुरुवातीला मी शिव्या ऐकल्या त्यानंतर बंद झाल्या, पण पुन्हा आता दोन महिन्यांपासून शिव्या द्यायला सुरुवात झाली आहे. जरांगेंनी आतापर्यंत २५ वेळा उपोषण केले. पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी जातीवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याकडे देखील महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष दिले नाही”, असेही भुजबळ म्हणाले.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

तसेच भुजबळांनी जरांगेंनी सगेसोयरे अधिसूचना जारी करून मराठा समाजाला (Maratha Community) तातडीने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अन्यथा २८८ जागांवर उमेदवार उभे करुन सत्ताधाऱ्यांना पाडणार या दिलेल्या इशार्‍याचाही खरपूस समाचार घेतला. यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मी तर मागेही म्हणालो होतो की, जरांगेंनी २८८ विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करावे. यातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे. म्हणजे त्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडविता येईल आणि जास्त उमेदवार निवडून आले तर त्यांना मुख्यमंत्री होता येईल”, असा उपरोधात्मक टोलाही यावेळी छगन भुजबळांनी जरांगेंना लगावला.

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर भुजबळांची नाराजी

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जात आहे. तसेच महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांकडून केली जात आहे. त्यानंतर आता वादग्रस्त विधान करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “प्रबोधन करतांना दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळावा. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, कुणाचे मन दुखवू नये. हिंदू,मुस्लिम सर्वांनी शांतता पाळावी”, असे आवाहन यावेळी भुजबळांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...