Tuesday, July 2, 2024
HomeराजकीयChhagan Bhujbal : "जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी..."; भुजबळांनी...

Chhagan Bhujbal : “जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी…”; भुजबळांनी जरांगेंना ललकारलं

जालना | Jalna

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांचे जालन्यातील वडीग्रोदी येथे मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये,या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हाके आणि वाघमारे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.यावेळी मंत्री भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित करतांना मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत त्यांना सूचक असा इशारा दिला.

हे देखील वाचा : सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळाकडे रवाना

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. मनोज जरांगे काय बोलतात, हे त्यांना सुद्धा कळत नाही. जरांगे यांनी हाके यांच्यासोबत चर्चा करावी. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, आमच्या ताटातले आरक्षण देऊ नका.आम्ही त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देतो, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले.तसेच ओबीसी समाजाने (OBC Community) एकत्र राहावे, असे आवाहन करत भुजबळ यांनी तु्म्ही सगळे एकत्र राहिलात तर तुमचे आरक्षण टिकेल, अशी सादही त्यांनी ओबीसी समाजाला घातली.

हे देखील वाचा : मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

पुढे भुजबळ म्हणाले की, आम्हाला खूप धमक्या येतात. मात्र, आम्ही कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही. पंरतु, सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं,” अशी शरोशायरी म्हणत भुजबळ यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) इशारा दिला. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते उपोषणासाठी बसले आहे. पण, आम्ही त्यांची समजूत घातली आहे. कारण, आपल्याला लढायचे आहे. लढण्यासाठी आमचे वाघ परत रस्त्यावर पाहिजेत, असेही भुजबळ यांनी म्हटले.

हे देखील वाचा : “महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान

पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही केला उल्लेख

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभेला पराभव केल्याचा आरोपही यावेळी छगन भुजबळ यांनी केला.ते म्हणाले की, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत झाली.बीडमध्ये उमदेवारांची घोषणा झाल्यानंतरच ओबीसी आणि मराठा (OBC Maratha) आमनेसामने आले होते.निकालानंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला. मात्र, विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती, असे भुजबळ यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या