Tuesday, September 17, 2024
HomeनाशिकNashik News : मंत्री छगन भुजबळांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

Nashik News : मंत्री छगन भुजबळांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज श्रावण मास पर्वकाळ साधत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी त्यांच्यासमवेत काही पाहुणे देखील होते. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले व मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

भुजबळ यांचे आजही त्र्यंबकेश्वर-नाशिक (Trimbakeshwar-Nashik) असे समीकरण आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षानंतर अचानक छगन भुजबळ त्र्यंबकराजाचा मंदिरात (Trimbakeshwar Temple) आल्याने त्यांनी देवाकडे काय मागणी केली असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भुजबळ यांनी मागील कुंभमेळ्यात (Kumbh Mela) त्र्यंबकेश्वर आणि नाशिकसाठी मोठी विकासकामे केली आहेत. आजही ती कामे काही अंशी चांगली आहेत. त्यामुळे भुजबळ यांचे आजही कामांच्या दर्जाच्या बाबतीत चांगले नाव निघत आहे.

हे देखील वाचा : आमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

भुजबळांनी सहकुटुंब घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

मंत्री भुजबळ यांनी त्र्यंबकराजासोबतच वणी (Vani) येथे जाऊन आदिशक्ती आदिमाया सप्तशृंगी देवीचे देखील सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भुजबळ समर्थकही मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भुजबळांच्या माध्यमातून रोपवे प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी संदीप बेनके, अजय दुबे, रोपवे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लूंबा उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या