Wednesday, April 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कृषीमंत्र्यांचा निर्णय

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कृषीमंत्र्यांचा निर्णय

मंत्री दादा भुसेंनी केली होती मागणी

मुंबई | Mumbai

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँक व्यवस्थापकाला ४० लाखांचा गंडा

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काष्टी ता.मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मंत्री भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागास केल्या होत्या. त्यानुसार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे नाव बदलून आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी ता.मालेगाव जि.नाशिक’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, या संकुलात दरवर्षी सुमारे ३२० विद्यार्थी प्रवेश घेतात तर साधारण चार वर्षांमध्ये बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) शेतकऱ्यांना (Farmer) अध्यायवत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्याचा तळागाळात योग्य प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने हे कृषी विज्ञान संकुल अत्यंत उपयुक्त असून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या कृषी विज्ञान संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Akole : अकोलेचा ग्रामसेवक वर्पे सेवेतून बडतर्फ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील समशेरपूर/देवठाण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र किसन वर्पे यांना सेवेत गैरवर्तन व गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वर्पे...