Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा मुंडेंना दरमहा द्यावी...

Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा मुंडेंना दरमहा द्यावी लागणार पोटगी

मुंबई | Mumbai

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव आल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात (Court) धाव घेतली होती. यानंतर आता त्यांचे आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने मान्य करत करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला आहे.त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे पोटगी वाढवून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात (High Court) अपील करणार असल्याची माहिती करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. त्या म्हणाल्या की,”मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. फक्त पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेले जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते”, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की,”मी १५ लाख प्रति महिना पोटगी (Alimony) मिळावी म्हणून मागणी केली होती. पण न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी १५ लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. तसेच माझा करुणा धनंजय मुंडे असा उल्लेख करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सेटलमेंट करा असे धनंजय मुंडे मला वारंवार बोलले. मी आत्महत्येचा विचार देखील केला होता. मात्र, माझ्या मनात कायम मुलांचा विचार येतो”, असेही करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. .

नेमकी किती पोटगी द्यावी लागणार?

करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले की,”करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...