Saturday, July 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : "आयुष्यातील साडेसाती दूर होवो"; कोकाटे शनिचरणी लीन, मंत्रिपदावरील संकट...

Manikrao Kokate : “आयुष्यातील साडेसाती दूर होवो”; कोकाटे शनिचरणी लीन, मंत्रिपदावरील संकट टळणार?

नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी (Rummy) खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत.यावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोकाटे यांच्याबाबत सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -

त्यानतंर आता संकटात सापडलेल्या राज्याचे कृषिमंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज (शनिवार) तालुक्यातील प्रसिद्ध शनीमांडळ येथील शनिदेवाच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा-अर्चना केली. आपल्यावरील व लोकांवरील साडेसातीचे संकट दूर व्हावे, यासाठी शनिदेवाला प्रार्थना कोकाटे यांनी केली.त्यांच्या या नंदुरबार दौर्‍याची आणि शनिपूजेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील शनीमांडळ गावात भेट देवून कोकाटे हे शनिचरणी लीन झालेले दिसून आले. त्यांनी मंदिरात (Temple) विधीवत पूजा करून शनिदेवाचा अभिषेक केला. यावेळी त्यांनी लोकांवरची साडेसाती दूर व्हावी, सोबतच आमच्यावरचेही संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. देशातील साडेसाती मुक्त देवस्थान म्हणून शनीमांडळची ख्याती असल्याने, राजकीय अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी कोकाटे यांनी शनिदेवाला साकडे घातल्याचे बोलले जात आहे.

यावेळी कोकाटे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकाटे यांच्यावरील राजकीय दबाव वाढत असताना, त्यांनी साधलेला हा धार्मिक दौरा त्यांच्या पुढील राजकीय (Political) वाटचालीसाठी कोणता संकेत देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) शनीमांडळ येथे प्रसिद्ध शनिदेवाचे मंदिर असून, हे मंदिर साडेसाती आणि शनिदोषापासून मुक्ती देणारे जागृत देवस्थान मानले जाते. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी आणि आपल्यावरील संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करण्यासाठी येत असतात. त्यामुळे अनेक राजकीय नेतेही येथे दर्शनासाठी येत असल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...