Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPratap Sarnaik : "हिंमत असेल…"; मीरा-भाईंदरच्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक सहभागी होणार, नेमकं...

Pratap Sarnaik : “हिंमत असेल…”; मीरा-भाईंदरच्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक सहभागी होणार, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर (Mira-Bhayander) येथे एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणानंतर काढलेल्या मोर्चाला (Morcha) प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून आज (मंगळवारी) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी (Police) परवानगी नाकारली. त्यामुळे सध्या मीरा भाईंदरमधील मराठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या सर्व लोकांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. त्यानंतर आता मीरा भाईंदरमधील या मोर्चात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

मीरा भाईंदर येथील मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही यावरून मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sirnaik) यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले होते. तसेच पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही? मीरारोडमध्ये जे सुरु आहे ते अत्यंत चुकीचं आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.

YouTube video player

यानंतर आता या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक देखील सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, “मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितली होती तर ती त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरु केलेली आहे, ही दादागिरी त्या भागाचा आमदार (MLA) म्हणून मी कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी ज्या काही मराठी लोकांची धरपकड सुरु केली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांकडेही निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करुन दाखवावी”, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

सरनाईक पोलिसांबद्दल काय म्हणाले?

पोलीस कारवाईबद्दल संताप व्यक्त करताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “मिरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे ती योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांतताप्रिय मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी द्यायला हवी होती. पण पोलिसांनी कालपासून दादागिरी आणि गुंडगिरी सुरू केली आहे. ही दादागिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही,” अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली आहे.

मनसैनिक आक्रमक

मिरारोडमधील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रातील मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेकडून राज्यभरातील नेते, कार्यकर्त्यांना मीरा भाईंदरमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार आहे, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...