Thursday, September 19, 2024
Homeनगरसमस्यांमुळे ग्रामस्थांच्या उद्रेकाला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार

समस्यांमुळे ग्रामस्थांच्या उद्रेकाला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार

लोणी |प्रतिनिधी| Loni

- Advertisement -

तिव्र लोकभावना असलेल्या गावांमध्ये वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे समस्यांमुळे (Problems) ग्रामस्थांच्या उद्रेकाला सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसच (NCP) जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला. या गावांना विशेष पॅकेज देवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार (State Government) कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘सातेरं’ भावलं

सविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला. या राज्यात 15 वर्षे युपीएचे सरकार होते. पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतरीत होण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या या गावांवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचेच (NCP) वर्चस्व आहे. मग 15 वर्षे सत्तेत राहुन तुम्ही काय मिळविले. हे पाप तुम्ही कोणाच्या माथी मारणार? असा सवाल करुन मागील अडीच वर्षेही सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच (NCP) या गावामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची टिका त्यांनी केली.

संविधान जागर रॅलीने समता पर्वाची सुरुवात

शिवसेनेचे प्रवक्त संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवितांना ना. विखे पाटील म्हणाले, स्क्रीप्ट लिहीनं आणि दिलेल्या स्क्रीप्ट वाचनं याचा मोठा अनुभव त्यांना आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना संजय राऊत यांना रोज दिली जाणारी स्क्रीप्ट ही सिव्हर ओक येथूनच येत होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विदर्भात शेतकरी दिंडी काढण्याचा जाहीर केलेला निर्णय आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संवाद कार्यक्रम म्हणजे केवळ राजकीय फार्स असून अडीच वर्षे सत्तेत असताना त्यांना शेतकर्‍यांची आणि जनतेची आठवणही झाली नाही. ते आता शेतकर्‍यांचा कळवळा घेवून घराबाहेर पडले आहेत. परंतु यापुर्वी मराठवाड्यात जावून शेतकर्‍यांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या घोषणेची आठवण मुख्यमंत्री पदावर असताना ठाकरे यांना झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची शेतकरी दिंडी असेल किंवा उध्दव ठाकरेंच्या संवाद कार्यक्रमाला कोणताही जनाधार मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या सहकारी आमदारांना घेवून कामाख्या देवीला गेले असतील तर त्यात कोणतेही वावगे नाही. तो श्रध्देचा भाग आहे. त्यांच्या दौर्‍याला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु ज्या लोकांना जनतेने नाकारले त्यांच्याकडून या दौर्‍यावर टिका होणे साहजिकच आहे. टिका करण्यापेक्षा त्यांनीही आता आपली श्रध्दास्थान असलेल्या ठिकाणी जावून अभिषेक करावा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या