Thursday, May 2, 2024
Homeनगरगडाखांवर टांगती तलवार

गडाखांवर टांगती तलवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नामदार शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल झालेल्या खासगी फिर्यादीवर पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत काय निर्णय होतो, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. गडाख समर्थक आणि विरोधक याकडे लक्ष ठेवून आहेत. निर्णय गडाखांच्या विरोधात गेल्यास त्यांच्यावर पूर्ण ताकदीने राजकीय हल्लाबोल करण्याची तयारी विरोधकांनी केल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

कर्जतमध्ये महिलाराज तर पारनेरमध्ये आ. लंकेंचे निकटवर्तीय औटींना मिळणार पद

जलसंधारण मंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनीता शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध एका आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी खासगी फिर्याद ऋषिकेश शेटे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालय काय निर्णय देणार, याकडे नेवासा मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष आहे. निर्णय विरोधात गेल्यास ना.गडाख यांचे राजकारण अडचणीत येऊन मंत्रीपद तर जाणार नाही, या शंकेने त्यांच्या समर्थकांना घेरले आहे. काही विरोधक सोशल मीडियावर सक्रीय आहेत. दरम्यान या घटनेवर ना. गडाख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही.

नेवासा नगरपंचायतीचे अध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित

गडाख यांना मंत्रिपदावरून पायउतार करायचेच, असा राजकीय संकल्प एका नेत्याने केल्याचे म्हटले जाते. एक उद्योजक, राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीवर असलेले तरुण नेते यांना पुढे करून यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. यासाठी नेवासा, खुपटी, घोडेगाव परिसरातून मिळणारी रसदही चर्चेत आहे.

नेवासा : 17 गावाच्या पाणी योजनेच्या दुरुस्ती व वाढीव कामासाठी 28 कोटी मंजूर

2014 ची विधानसभा निवडणूक गमावल्यानंतर पुढील निवडणुकांमध्ये गडाख यांनी विरोधकांना सातत्याने राजकीय मात दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदही पटकावले. तेव्हापासून विरोधकांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी अधिक जोर लावत डावपेच आखले. मात्र ना. गडाख प्रत्येकवेळी राजकीयदृष्ट्या सहिसलामत सुटले. यावेळी काय होणार, हा प्रश्न त्यामुळे महत्त्वाचा ठरला आहे.

शिर्डी नगराध्यक्षपदही महिला खुल्या प्रवर्गासाठीआ. कानडेंनी स्वीकारले अंजुम शेख यांचे निमंत्रण !

- Advertisment -

ताज्या बातम्या