Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : नगरसह राज्यात महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न

Ahilyanagar : नगरसह राज्यात महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न

नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढविण्याबाबत चर्चा करणार आहोत. महायुती म्हणून निवडणुकांना समोरे जाण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमानंतर विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, संपत बारस्कर, निखिल वारे, अविनाश घुले, सागर बेग, विनायक देशमुख, स्मारक समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगितले आहे. अहिल्यानगर महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवावी, अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशीच युती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर परिणाम होईल का? याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आले म्हणून परिणाम होत नसतो.

YouTube video player

जनतेचा विश्वास सरकारवर आणि केलेल्या कामावर आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही. पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची चर्चा आहे, याबाबत विखे पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढवे किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. अशा वेळी इतर घटकासोबत जाणे योग्य नाही.

आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई
नगरच्या प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मंगळवारी सांयकाळी ढोल पथकांच्यावतीने तालबद्ध वादनाने मानवंदना देण्यात आली. यावेळी शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते सागर बेग, संपत बारस्कर, अनिल मोहिते, अनिल शिंदे, अभय आगरकर, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, सतिश बारस्कर, विनायक देशमुख, सुरेंद्र गांधी, महिंद्र गंधे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. पुण्याचे प्रसिद्ध शिवशाहीर चंद्रकांत माने यांचा पहाडी आवाजात पोवाडा रंगला.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...