Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Crime News : अल्पवयीन मुलांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडीच्या भुतकरवाडी परिसरात ए.टी.एम. मशिन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची घटना समोर येताच तोफखाना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
25 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास, भुतकरवाडी येथील खंडेलवाल हॉस्पिटलसमोर असलेल्या इंडिया वन कंपनीच्या ए.टी.एम. मशिनचे मेन दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी मशिनचे डिजिटल लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, तसेच सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या वायर कापून ते निष्क्रिय केले.

- Advertisement -

ए.टी.एम. मशिन फोडण्याचा प्रयत्न करताना मशिनचे आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी आरीफ मंगतुद्दीन खिलजी (वय 50, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे 24 तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

YouTube video player

पोलिसांनी या गुन्ह्यामागे दोन अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. दोघांना पालकांच्या समक्ष ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अंमलदार गोपीनाथ गोर्डे, सुनील चव्हाण, योगेश चव्हाण, सुधीर खाडे, सुमित गवळी, सुजय हिवाळे, सतिष त्रिभुवन, कपील गायकवाड, बाळासाहेब भापसे, सतिष भवर, भागवत बांगर, अविनाश बर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...