Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमलॉजवर घेऊन जात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

लॉजवर घेऊन जात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

धमकी देत अनोळखी व्यक्तीने दोघांना लुटले; धक्का लागल्याचा बहाणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीला (वय 17) प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर घेऊन जात तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी मंगळवारी (16 जुलै) दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या संशयित तरूणाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

निखील सुनील दळवी (रा. अरणगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलीची निखीलसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाचे व लग्न करण्याचे आमिष दाखविले. निखील याने दुचाकीवरून फिर्यादी अल्पवयीन मुलीला नोव्हेंबर 2023 (तारीख नाही) ते 28 जून 2024 दरम्यान वेळोवेळी कल्याण रस्त्यावरील जाधव मळा परिसरातील एका लॉजवर, नगर – पुणे महामार्गावरील चास (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर व नगर – जामखेड रस्त्यावरील दरेवाडी शिवारातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यासोबत इच्छेविरूध्द, बळजबरीने संबंध ठेवले. फिर्यादीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असता जातीवाचक बोलून तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही असे म्हणून लग्न करण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player

दरम्यान, पीडिताने सदरचा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी 16 जुलै 2024 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून निखील सुनील दळवी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....