Friday, May 3, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

सावळीविहीर (वार्ताहर) –

राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील स्नेहल अजीत पवार या सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने ओढणीच्या साह्याने

- Advertisement -

राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना काल घडली. हे कुटुंब राजवाडा परिसरात राहते. बुधवारी दुपारी सदर मुलीचे आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी तीची मोठी बहीण व लहान भाऊ होते.

ते दुपारी आजूबाजूला खेळण्यासाठी गेले होते. तिचा भाऊ घरात घुसला असता त्यास भिंतीला असलेल्या खुंटीला स्नेहल ओढणीने फास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने तो घरातून जोरात ओरडत बाहेर पळाला.

आजूबाजूच्या लोकांनी तेथे धाव घेतली. घटनेची खबर पोलीस पाटील सुरेश वाघमारे व राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली.

सावळीविहीर बीट हवालदार गणेश सोनावणे, पो. कॉ. राऊत, पो. कॉ. दिनकर यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही करत मृतदेह शवागृहात पाठवला. त्यानंतर प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे सदर मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले.

काल दुपारी तिच्यावर सावळीविहीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मृतदेहा जवळ काही सापडले नसल्याने पोस्टमार्टेम नंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या