Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAvinash Jadhav: "…तर इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल"; अविनाश...

Avinash Jadhav: “…तर इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल”; अविनाश जाधवांचा इशारा, म्हणाले…

मिरा भाईंदर | Mira Bhayandar
मिरा भाईंदरमध्ये मंगळवारी काढण्यात आलेल्या मराठी मोर्चावरुन मुंबईतील राजकारण चांगलेच तापताना दिसले. या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, मराठी मोर्चेकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर दोन ते तीन तासांनी पोलिसांनी मोर्चाला अधिकृत परवानगी दिली नसली तरी आंदोलकांना बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यामुळे मीरा भाईंदरमधील हा मराठी मोर्चा काहीप्रमाणात यशस्वी ठरला आहे.

पोलिसांनी मनसे आणि ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. या घडामोडींदरम्यान, मीरा-भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापले असून, मनसेसह अन्य मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाने दाखवलेल्या एकीबद्दल आनंद व्यक्त केला. मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा होणे महत्त्वाचे होते. आम्ही नसतानाही लोकं तिकडे रस्त्यावर उतरली होती. त्यांनी मराठीचा माज काय असतो, हे दाखवून दिले. ज्या लोकांनी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. परंतु, मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, आज मराठी माणूस एकजूट झाला. मला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीरा भाईंदर, वसई आणि विरारमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली नसती आणि आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चाला असते तर हा मोर्चा प्रचंड झाला असता. हा मोर्चा होणे खूप गरजेचे होते.

YouTube video player

इथला आमदार म्हणतो…
पुढे अविनाश जाधव असे ही म्हणाले, इथला एक आमदार नरेंद्र मेहता तो नेहमी सांगतो की मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस फक्त १२ ते १५ टक्के आहे. तेवढ्या टक्क्यावर आम्ही तुला पूरून उरू शकतो. आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या नादाला कुणी लागेल त्याने लक्षात ठेवावे.’ अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला.

जेवढे मी अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढे मी इथे येताना अस्वस्थ होतो
तसेच, ‘मला रात्री जेव्हा उचलले तेव्हा जेवढे मी अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढे मी इथे येताना अस्वस्थ होतो. जे काही मराठी माणसाने आज मीरारोड- भाईंदरमध्ये करून दाखवले त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी ज्या पोलिस स्टेशनला होतो त्या पोलिस स्टेशनचा प्रत्येक हवलदार टीव्हीवर हेच पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्यानंतरचा आनंद मी पाहत होतो. तो एक सर्वसामान्य मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद होता. हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने घेतला असेल. प्रत्येक घराघरात हे आंदोलन गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडले तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.’ , असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

अविनाश जाधव यांनी पुढे सांगितले की,’वसई-विरार परिसरातील आमच्या मनसौनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरली. आमच्या लोकांना गाडीतून घेऊन जात होते. उचलू उचलू गाडीत भरत होते. आम्ही काय दहशतवादी आहोत का? मीरा- भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. मीरा -भाईंदर हे महाराष्ट्रात असल्यास मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.’ तसंच, ‘नरेंद्र मेहता या माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्याने ३० ते ४० सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल केला. या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची आहे. इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मराठी माणसाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आम्ही उपाशी मरणार नाही. आम्ही ठरवले तर तुम्ही उपाशी मराल.’, असा इशारा अविनाश जाधव यांनी गुजराती लोकांना दिला आहे.

प्रताप सरनाईक यांच्यातील मराठी माणूस जागा झाला आहे
“प्रताप सरनाईक यांच्यातील मराठी माणूस जागा झाला आहे, असे मला वाटते. त्यामुळे ते बोलतात याबद्दल मला आनंद आहे. अशी कोणतीही गोष्ट घडली असेल तर ती योग्य नाही. मोर्चाचा आयोजक म्हणून मलाही ते आवडणार नाही. आम्ही हा मोर्चा काढता जर हा मोर्चा शांततेत काढता तर त्याला कोणतेही गालबोट लागू नये ही आमची जबाबदारी होते. अनेक लोक यात तुम्ही सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील कोणीतरी हे कृत्य केले असावे, याचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही”, असेही अविनाश जाधव म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...