Wednesday, October 9, 2024
HomeमनोरंजनMithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दिल्ली | Delhi

बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा ८ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. ‘मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सध्या वैष्णव यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ८ ऑक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन दा यांना प्रदान करण्यात येणार आहे. असं देखील अश्विनी वैष्णव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी कोलकाता याठिकाणी झाला. त्यांच्या कारकिर्दीविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या नावावर ३५०हून अधिक सिनेमे आहेत. अभिनयाशिवाय त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले असून, सध्या मिथुन राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या