Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrajakt Tanpure : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश; अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी...

Prajakt Tanpure : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश; अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आज (दि. ३० मे) भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात (BJP Office) दुपारी तीन वाजेच्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे तसेच नगरसेवक व पक्ष प्रवक्ता नवनाथ बन उपस्थित होते. दरम्यान पक्ष प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तनपुरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांची भेट घेतली होती. आपण पक्ष का सोडत आहोत, यामागील कारणांची माहिती त्यांनी सुळे यांना दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे यांच्या या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar District) आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना तनपुरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, “मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. माझे मामा जयंत पाटील यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही. त्यांना सांगितलं देखील नाही. तसेच शरद पवार यांना देखील भेटायची हिमंत नाही. मात्र मतदारसंघातील अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या जीवावर मी संघर्ष केला, त्यांच्या भावनांचाही मला विचार करावा लागेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण बघायचं आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला”, असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.



ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...