Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याअनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान; म्हणाले...

अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान; म्हणाले…

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांचे वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयाचे (Unauthorized office) बांधकाम तोडण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांसह परब आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर (Kirit Somayya) गंभीर आरोप केले आहेत…

- Advertisement -

यावेळी परब म्हणाले की, पाडकाम केलेले कार्यालय अनधिकृत नसून किरीट सोमय्यांना मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचे नाही, त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही हे धोरण ठरवत बिल्डर्सकडून सुपारी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सोमय्यांना इथे यायचे असेल तर पोलिसांनी (Police) त्यांना अडवू नये. त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा, असे आव्हानही अनिल परबांनी दिले.

पुढे ते म्हणाले की, म्हाडा (Mhada) आणि या इमारतीमधील रहिवासी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझा जन्म झाला आणि बालपण गेले. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. परंतु, या जागेबाबत काहींनी तक्रारी केल्या. मी मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडाच्या लोकायुक्तांकडे (Lokayukta) जाऊन हे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगितले.

यानंतर म्हाडाने मला नोटीस दिली, त्याला मी उत्तर दिले. ही जागा माझी नाही यासंदर्भात मी स्पष्टीकरण दिले. मी फक्त जागा वापरत होतो. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली. रहिवासी कोर्टात गेले तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. म्हाडाने मला पत्र दिलं की रेग्युलाईज करता येणार नाही, असे सांगितले. यानंतर किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला व तेव्हाच या जागा इमारतीने स्वतःहून मोकळ्या केल्या असे परब म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या