Friday, May 3, 2024
Homeनगरराष्ट्रीय महामार्ग 752 जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करा

राष्ट्रीय महामार्ग 752 जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा या मार्गाला एन.एच.752 जी हा क्रमांक देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नाही. त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्यावा, अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत या मार्गाची दुरवस्था होऊन अनेक ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मतदार संघातील खराब झालेले रस्ते व सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत आमदार आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.

त्यांना खराब झालेल्या रस्त्यांची माहिती देऊन सविस्तर चर्चा केली. सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडीपर्यंत एन.एच.160 मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवापर्यंत या रस्त्यासाठी एन.एच.752 जी असा क्रमांक देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. एन.एच.160 साठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मात्र एन.एच.752 चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झालेले नसल्यामुळे या मार्गासाठी निधीची तरतूद झालेली नाही. मतदार संघातील अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून अनेक रस्त्यांवरील पूल धोकादायक झाले आहेत. त्यामुळे भविष्यात याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावळीविहीर ते सेंधवा या एन.एच. 752 जी महामार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या