Thursday, May 2, 2024
Homeनगरआमदारांना बंपर गिफ्ट

आमदारांना बंपर गिफ्ट

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

विधानसभेत पुरवणी मागण्या मांडताना अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याच्या घोषणेचा देखील समावेश होता.

- Advertisement -

1 मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांनी 30 टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल, असं अजित पवारांनी जाहीर केलं.

आमदार निधीत 1 कोटीची वाढ

यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी आमदार निधीमध्ये देखील वाढ केल्याचं जाहीर केलं. करोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात 3 कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचंही असलं, तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी 4 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 350 कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

आमदारांसाठीच्या गाडीचा मुद्दा यावेळी काही आमदारांनी मांडला होता. त्यावर मिश्किलपणे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, गाडीसाठी जे करायचंय ते फाईलवर करतो, उगीच सगळ्या महाराष्ट्राला नको कळायला. ड्रायव्हरच्या मागणीवर देखील चर्चा करून ती मान्य केली जाईल! त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आमदारांसाठी या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

नगर जिल्ह्याला होणार लाभ

नगर जिल्ह्यात विधानसभेचे 12 तर विधानपरिषदेचे 2 असे एकूण 14 आमदार आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. तसेच नगर जिल्ह्याला आमदार निधीच्या रूपाने 14 कोटींचा निधी अधिक मिळवता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या