Thursday, March 13, 2025
Homeनगरपाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे आ. काळेंनी वेधले लक्ष

पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे आ. काळेंनी वेधले लक्ष

ना. राधाकृष्ण विखेे यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव मतदार मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली होती. त्यनुसार मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ. काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले असता हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी ना. विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

- Advertisement -

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तीरनमवार, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता विजय घोगरे व गवळी, छत्रपती संभाजीनगर अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सब्बीनवार, उत्तर महाराष्ट्र मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नासिकचे राजेश गोर्वधणे, मंत्रालय जलसंपदा विभागाचे सह सचिव संजीव टाटू आदी अधिकारी उपस्थित होते. कोपरगाव मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांना कालव्यावर आरक्षण मिळावे. गोदावरी कालवे नुतनीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी दोन्ही कालव्यांचे क्षेत्रीय उपविभागीय कार्यालय नाशिक येथून कोपरगाव व राहाता येथे स्थलांतरीत करावे. नांदूर मधमेश्वर जलद कालव्याची देखभाल व दुरुस्ती करावी.

विशेष बाब म्हणून चासनळी, जेऊर कुंभारी व मायगाव देवी येथे प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांना गोदावरी कालव्यांवर आरक्षण द्यावे. कोपरगावचा पाणीपुरवठा तलाव 4 व 5 साठी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून मुख्य विमोचक बांधून मिळावे. ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात यावी. दारणा प्रकल्पाअंतर्गत गोदावरी डावा कालवा व वितरण प्रणाली सुधारणा करून कामाचे प्रथम टप्प्यात समावेश करण्यात यावा. नांदूर मधमेश्वर जलद कालवा वितरिका 1 व 2 चे नूतनीकरण करण्यात यावे. गोदावरी नदीवरील केटीवेअरमधून उपसा सिंचनासाठी परवानगी मिळावी. गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांची देखभाल दुरुस्ती साखर कारखान्यांमार्फत केली जात असून 2006 ते 2012 व 2021 ते 2024 या कालावधीतील कारखान्यांचे देय बिलाच्या रकमेचे समायोजन पाणी पट्टीमध्ये करण्यात यावे. अशा विविध मागण्या मांडल्या.

या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे येत्या काही दिवसांत गोदावरी कालव्यांच्या कामाला गती येणार असून पूर्व भागातील गावांसाठी खरीप हंगामात ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यावर उपसा जलसिंचन योजना मंजूर होऊन त्या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच केटीवेअर मधून उपसा सिंचनासाठी पाणी उचलण्यास परवानगी मिळून अनेक गावांना फायदा होणार आहे. आ.आशुतोष काळे यांनी मांडलेल्या प्रश्नांना चालना मिळून त्याचे दूरगामी फायदे होणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...