Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआमदार मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांना यश; दावोसमध्ये चाळीसगावसाठी 'इतक्या' हजार कोटींच्या महाप्रकल्पाचा सामंजस्य...

आमदार मंगेश चव्हाणांच्या प्रयत्नांना यश; दावोसमध्ये चाळीसगावसाठी ‘इतक्या’ हजार कोटींच्या महाप्रकल्पाचा सामंजस्य करार

चाळीसगाव | Chalisgaon
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारे करार दावोस येथे घडला. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, महाराष्ट्र शासनाने SAF प्रकल्पासाठी अमेरिका स्थित सॅन फॅन्सीस्को येथील ACTUAL HQ या कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण, Actual HQ” या कंपनीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन, कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार आहे.

YouTube video player

राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते.

राज्याच्या राजकारणात खळबळ; भाजप-एआयएमआयएमची युती, कुठे झाली कमळाची पतंगासोबत युती?

वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगांव येथे मोठा उद्योग येणार असून त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही असे सूतोवाच केले होते, अखेर आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला असून, चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे अंदाजे १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून Sustainable Aviation Fuel (SAF) तयार केले जाणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण प्रकल्प 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, BESS सह 24×7 वीज, 100 टक्के पाणी पुनर्वापर, EV ट्रकद्वारे वाहतूक, तसेच ESG निकषांचे पूर्ण पालन केले जाणार आहे.

या करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की “आजचा दिवस चाळीसगांव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे, जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच आले असून लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मतदारसंघात काम करत असताना सिंचन, रस्ते, दळणवळण यासोबतचं नवीन उद्योग व त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती तसेच शेतकऱ्यांची उत्पन वाढ व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील होतो. गेल्या वर्षभरापासून याबाबत बोलणी व पाठपुरावा सुरू होता. आज अखेर याचा एक मोठा टप्पा पार झाला असून महाराष्ट्र सरकारने SAF प्रकल्पासाठी ACTUAL HQ आणि Sankla Renewables Pvt. Ltd. या दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे.

ही फक्त सुरुवात असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने दूर करून चाळीसगांवच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या साथीने व चाळीसगांवच्या जनतेच्या आशिर्वादाने पूर्ण करू” असा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवला.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....