Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्याच्या राजकारणात खळबळ; भाजप-एआयएमआयएमची युती, कुठे झाली कमळाची पतंगासोबत युती?

राज्याच्या राजकारणात खळबळ; भाजप-एआयएमआयएमची युती, कुठे झाली कमळाची पतंगासोबत युती?

मुंबई | Mumbai
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. एकीकडे महापौरपदाच्या सोडती जाहीर होत असतानाच दुसरीकडे राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सत्तेसाठी भाजपने थेट एमआयएम पक्षाशी युती केली आहे. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत होते. काहीही झाले तरी भाजपसोबत जायचे नाही, अशी भूमिका एमआयएमचे अध्यक्ष असदद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे.

भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद देण्यात आले आहे. एमआयएमचे ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

Sanjay Raut: “जर त्यांच्यासोबत जायचं होतं तर युती कशाला केली?” संजय राऊतांचा केडीएमसीतील युतीवरुन संताप

एमआयएमच्या ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत जात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कधीही एमआयएम आणि भाजपा एकत्र येईल, असा साधा कोणी विचारलही केला नाही. मात्र, अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात ठरले आहे.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...