Friday, May 3, 2024
Homeनगरकोरोनाच्या संकटात आमदार लंके यांचा स्वखर्चातून मदतीचा हात

कोरोनाच्या संकटात आमदार लंके यांचा स्वखर्चातून मदतीचा हात

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूमुळे  असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचा रोजगार हातातून गेला असून हातात असलेला पैसा देखील संपला आहे. त्यामुळे गोरगरिबांना अन्न-धान्य पुरवण्यासाठी आमदार लंके प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. नगर तालुक्यातील विळद, पिंप्री घुमट येथील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना येत्या मे महिन्याचे धान्य रेशन दुकानामध्ये आमदार लंके प्रतिष्ठानमार्फत मोफत देण्यात येणार आहे.

- Advertisement -

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी विळद सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष आणि पिंप्री घुमटचे सरपंच रभाजी सुळ, सहसचिव बाळासाहेब बाचकर यांच्याकडे एक महिन्याच्या धान्यासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

या मदतीबद्दल सुनिल कोकरे, विजयराव अडसुरे, संदीप जगताप, दत्ता खताळ, बापूसाहेब जगताप, संजय बाचकर, रमेश जवरे, बाळासाहेब वाळके, संतोष अडसूरे, सखाराम होडगर, बाळासाहेब गुलदगड, रामेश्वर होडगर, वृत्तीक पगारे, किरण बाचकर आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार लंके मतदारसंघातातील गावांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आमदार लंके यांची मतदारसंघात जनजागृती मोहीम सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, सोशल डिस्टेंसिंग चे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या