Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याआमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नोटिसची वेळ संपली; आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकर म्हणाले...

आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नोटिसची वेळ संपली; आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकर म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

१६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण (16 MLA Disqualification) अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी भाष्य केले आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दिरंगाई होत असल्याबाबत ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. यातच सुनावणीला दिरंगाई होणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या आमदारांनी नोटिसीला उत्तर दिले आहे.

चांद्रयान मॉड्यूलच्या लँडिंग वेळेत बदल; इस्रोने दिली महत्वाची अपडेट

आमदार अपात्रेवर नार्वेकर म्हणाले की, आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचे मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत. दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, अस आश्वासनही नार्वेकर यांनी दिले.

उद्धव ठाकरेंची ताकद वाढली! माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश

दरम्यान, चांद्रयान मोहिमेसाठी आमदार राहुल नार्वेकर यांनी शुभेच्छा देताना म्हंटले, “सर्व भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी ही चांद्रयान ३ मोहिम भारताने हाती घेतले आहे. काही तासातच चांद्रयानची अंतिम कार्यवाही होईल. सगळेच आतुरतेने या यशाची वाट पाहत आहेत. मी देशवासीयांना यानिमित्त शुभेच्छा देतो. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडून भारताला आणखी एक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो,” अशी भावना नार्वेकरांनी व्यक्त केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या