Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याआ.रोहित पवारांनी पंतप्रधानांकडे केली "ही" मागणी !

आ.रोहित पवारांनी पंतप्रधानांकडे केली “ही” मागणी !

मुंबई | Mumbai

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा (1993 bombay bombings) कट रचल्याचा आरोप असलेला व संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (United Nations) तयार केलेल्या जगभरातील ८८ दहशतवाद्यांच्या (88 terrorist) यादीत असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये (dawood ibrahim in pakistan) असल्याचे पाकिस्तानने मान्य केले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (ncp mla rohit pawar) यांनी दहशतवादी दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्याकडे केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचे पाकिस्तानने कबूल केले आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा.”

- Advertisment -

ताज्या बातम्या