Tuesday, March 25, 2025
Homeनगरगडाखांवर लवकरच राजकीय वक्रदृष्टी !

गडाखांवर लवकरच राजकीय वक्रदृष्टी !

मुळा एज्युकेशन विरोधात कुलाबा पोलिसांतील तक्रार अर्जाची चौकशी

मुंबई/अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख (MLA Shankarao Gadakh) यांच्याशी संबंधित नेवासा (Newasa) तालुक्यातील सोनई (Sonai) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीने वनजमिनीवर ताबा व झाडे तोडून इमारत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात (Mumbai Kulaba Police Station) तक्रार अर्ज करण्यात आला आहे. याबाबत चौकशी सुरू झाली असून लवकरच गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांची राजकीय अडचण होणार असून ते काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

मुळा एज्युकेशन सोसायटी (Mula Education Society) 2018 मध्ये हरित लवादाकडे तक्रार झाल्याने चर्चेत आली होती. लवादाच्या निर्णयानंतर संस्था अडचणीत आली होती. त्याच प्रकरणात तक्रार झाल्याचे समजते. संस्थेने वनजमिनी (Forest Land) ताब्यात घेऊन झाडांची कत्तल करत इमारत बांधणे, बनावट कागदपत्रे तयार करणे असे आक्षेप नोंदवत एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष व विश्वस्तांवर कारवाईची मागणी कुलाबा पोलीसांना दिलेल्या एका तक्रार अर्जात केल्याचे समजते. हा अर्ज एक-दीड महिन्यापूर्वी देण्यात आला, मात्र आता याप्रकरणी माहिती संकलन व चौकशी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेत आला.

राज्यात सत्ताबदल झाल्यापासून गडाखांचा संघर्ष सुरू आहे. त्यांना सरकारने कोणताही विकासनिधी न दिल्याने त्यांची आधीच राजकीय कोंडी झालेली आहे. दूध संघावर केस, मुळा सहकारी साखर कारखान्याला कर्जहमी नाकारणे, मुळा बँकेची चौकशी अशा प्रकरणांमुळे गडाखांविरोधात आधीच घेराबंदी झालेली असताना मुळा एज्युकेशनचे प्रकरण ऐरणीवर आल्यास कोंडी अधिकच वाढणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आ.गडाख (MLA Shankarao Gadakh) मतदारसंघात सक्रीय आहेत. थेट जनतेच्या दारी पोहचत त्यांनी सुरू केलेला संवाद चर्चेत असताना चौकशांच्या माध्यमातून त्यांची कोंडी वाढवण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे या स्थितीचा सामना करण्यासाठी गडाख गट काय भुमिका घेणार? आगामी निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का, याची उत्सुकता वाढणार आहे.

गुन्हा दाखल होणार ?
मुळा एज्युकेशन सोसायटी (Mula Education Society) विरोधातील अर्जावर कुलाबा पोलिसांनी विविध शासकीय विभागांकडून माहिती मागविली असल्याचे समजते. याप्रकरणात आ.गडाख (MLA Shankarao Gadakh) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य व विश्वस्तांवर गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात होती. काही आ.गडाख समर्थक मुंबईत धावपळ करत असल्याने हा प्रकार चर्चेत आला. दरम्यान, आ.गडाख यांचा दूरध्वनी संपर्काबाहेर असल्याने त्यांची प्रतिक्रीया मिळाली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...