Thursday, May 2, 2024
Homeनगरविविध कामांमुळे पुणतांबा परिसराच्या विकासाला चालना : आ. विखे

विविध कामांमुळे पुणतांबा परिसराच्या विकासाला चालना : आ. विखे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा गावासाठी तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत केलेली विकास कामे ग्रामीण रुग्णालयाची इमारत,

- Advertisement -

ग्रामसचिवालयाची इमारत तसेच पूरक पाणीपुरवठा योजनेची सुरू झालेली कामे यामुळे गावाच्या विकासाला चालनाच मिळणार आहे, असे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पुणतांबा गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शुकलेश्वर वहाडणे होते. यावेळी पं. समिती सभापती नंदा तांबे, सदस्य सुवर्णा तेलोरे, जि. प. सदस्य श्याम माळी, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, मुख्याध्यापक सोमनाथ वैद्य, राजेंद्र लहारे, मनोज गुजराथी, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

आ. विखे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविल्यास हे काम लवकर मार्गी लागेल तसेच उड्डाणपुलाऐवजी पुणतांबा व चांगदेवनगर येथे भुयारी पुलाची कामेही रेल्वेमार्फत लवकर सुरू होतील.

गोदावरी नदीवर पुरणगाव येथील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर दक्षिणेकडील साईभक्तांना शिर्डीकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग उपलब्ध होईल व त्यामुळे पुणतांबा गावाच्या विकासाला मदत होईल. पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत त्यांनी अधिकारी वर्गाला योग्य सूचना दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल करण्यासाठी चांगले नवीन शैक्षणिक धोरण आणल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक संगीता भोरकडे यांनी केले. यावेळी डॉ. धनवटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दत्तात्रय धनवटे यांनी केले. विजय धनवटे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या