Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : "हड, मी ते पाणी पिणार नाही"; राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील...

Raj Thackeray : “हड, मी ते पाणी पिणार नाही”; राज ठाकरेंचे कुंभमेळ्यातील स्नानाबाबत विधान

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) १९ वा वर्धापन दिन सोहळा आज (रविवारी) पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी पक्षातील विविध नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाषण केले. यावेळी बोलतांना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “मुंबईला (Mumbai) मेळावा बैठक लावली होती.त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर नव्हते. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभाला गेलो होतो असे सांगितले. त्यांना म्हटले गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर अंघोळ केली का असे देखील विचारले. आता बाळा नांदगावकर यांनी कमंडलमधून पाणी आणले होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. तिथे आलेले माणसे अंग खाजवत होते आणि हे बाळा नांदगावकर म्हणतात गंगेचं पाणी घ्या. कोण पिणार ते पाणी असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली.

पुढे ते म्हणाले की,” नुकतीच करोनाची (Corona) महामारी येऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. कुणालाही कुणाचं देणंघेणं नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या येथील नद्यांना माता म्हणतो, मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र, आपल्या येथील नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते. नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

आपला पक्ष, संघटना मजबूत करणे महत्त्वाचे

आपली पक्ष संघटना सर्व ठिकाणी आहे. पण ही संघटना मजबूत करण्याची गरज आहे. गट अध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे की माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. माझ्यासकट प्रत्येकाचाच काय काम असणार हे दर १५ दिवसाला तपासले जाईल. जर महिना दीड महिन्यात जाणवलं की हा पदाधिकारी मग तो कुणी का असेना मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...