Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्या....अन् राज ठाकरेंनी रेखाटलं अजितदादांचं व्यंगचित्र; म्हणाले, “झालं ते गोड माना...”

….अन् राज ठाकरेंनी रेखाटलं अजितदादांचं व्यंगचित्र; म्हणाले, “झालं ते गोड माना…”

पुणे | Pune

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या व्यंगचित्रातून ते सामाजिक आणि राजकीय फटकेबाजी करत असतात. अशीच फटकेबाजी त्यांनी आज पुण्यात देखील केली.

- Advertisement -

राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्याच्या हस्ते आज पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याच्याकडे उपस्थित मान्यवरांनी व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी डोळ्यासमोर ठेवत अजित पवारांचे व्यंगचित्र काढले.

सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या मिश्किल टिपण्णीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. व्यंगचित्र काढल्यावर शेवटी नावं न लिहिता राज ठाकरे म्हणाले, गप्प बसा. असं राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. आता जे झालं ते गोड माना. मला असं व्यंगचित्र काढायची सवय नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे तर अधिकच चर्चांना उधाण आलं. राज ठाकरे यांना आपल्या कुंचल्यातून काय सांगायचं आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळाले. यानंतर अजित पवार यांचे वेगळेच सूर पाहायला मिळत होते. अजित पवार हे शरद पवारांच्या निर्णयाची सहमत असल्याचं पाहायला मिळत होते. शरद पवारांच्या घोषणेनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अजित पवार गप्प करत होते.

ताई दिल्लीत, दादा राज्यात… सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

‘ए तू चूप बस, ए तू खाली बस’ असे म्हणत सगळ्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी एक-एक करुन शांत बसवले. अजित पवारांची यांची ही भूमिका सगळ्यांची भुवया उंचावणारी ठरली होती. तेव्हापासून अजित पवार यांच्या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अजित पवार यांना लक्ष्य केलं.

Sharad Pawar : निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाले शरद पवार? वाचा ‘ते’ भाषण जसंच्या तसं…

- Advertisment -

ताज्या बातम्या