मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष (MNS President) राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तयारीसाठी मराठवाड्याचा दौरा करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या दौऱ्याचा समारोप होत असून त्यांनी याठिकाणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. तसेच जरांगेंच्या आंदोलनामागे विधानसभेचे राजकारण असल्याचा थेट आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केला.
हे देखील वाचा : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या दौऱ्यात मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषयही नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी मंडळी ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत, ते मला मराठवाड्यात दिसत आहे. यातील दुर्देवाचा भाग म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत सक्रीय झाले असून मला त्यांची नावेही माहीत आहेत. योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल. त्यातील दोन पत्रकार होते ते पूर्वीचे शरद पवार यांच्या जवळचे आहेत असे म्हणतात. त्यांचे फोटोही आहेत, तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतील हे मला कळलं नाही. उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray Group) आणखी दोन जण होते. परवा दिवशी नांदेडमध्ये असताना सर्किट हाऊसवर दोनजण ओरडत होते. त्यातील एक जणाचा शरद पवारांसोबतचा आताचा फोटो आहे. काल जे झालं, त्यात एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
हे देखील वाचा : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी
तसेच “कुणाला पेव्हर ब्लॉकची कामे मिळाली, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाली. कुणाला किती पैसे मिळाले आणि त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या. अशा सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या असून याची चौकशी होईल. मात्र, हे सर्व विधानसभेसाठी सुरू असून पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला. याशिवाय मी जेव्हा धाराशीवला होतो. तेव्हा धाराशीवला काही लोक भेटायला आले. त्यांना भडकवण्याचे काम काही पत्रकार करत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही या, तेव्हा तुम्ही खाली जा असं सांगणारे पत्रकार होते. माझ्यासोबत कोण येणार इथपर्यंत प्रकरण झाले”, असेही राज ठाकरे म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू
माझ्या नादी लागू नका
शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाने महाराष्ट्रात मणिपूर होईल,असं वक्तव्य केल आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचे राजकारण पाहिले तर तुम्हाला समजेल. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे, हे शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरु झाले, असे म्हणत या लोकांनी माझ्या नादी लागू नये. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत”, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
हे देखील वाचा : प्रवासी विमान कोसळलं, ६२ जणांचा मृत्यू… अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकसभेला पवार-ठाकरे यांच्या प्रेमाखातर मतदान झाले नाही
लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीला यश मिळाले हे खरं आहे. मविआच्या नेत्यांना वाटलं मराठवाड्यात मतदान झालं. मात्र, पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समजावून घेतलं पाहिजे की, ते मतदान मोदी आणि शाह यांच्या विरोधातील होते. त्यांच्या प्रेमाखातरचं मतदान नव्हते. मी नेहमी सांगत आलो की,विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतो. मुस्लिम आणि दलितांनी देशभर मोदींविरोधात मतदान केले. संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता इतर कुणीही नरेटीव्ह केलेले नव्हते. पण लोकं भडकले होते. त्यांनी मतदान केलं, पण ठाकरे-पवारांना वाटतं त्यांच्या प्रेमाखातर मतदान झालं.मात्र, त्यांच्या प्रेमाखातर मतदान झाले नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा