Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMNS Politics : मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अविनाश जाधवांच्या फोटोला कार्यकर्त्यांनीच...

MNS Politics : मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अविनाश जाधवांच्या फोटोला कार्यकर्त्यांनीच फासलं काळं

पालघर | Palghar

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत (Mumbai) गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) निमित्ताने भव्य सभा पार पडत आहे. पण दुसरीकडे पालघरमध्ये (Palghar) मनसेमधील (MNS) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळ फासण्यात आले आहे.

पालघरच्या बोईसर (Boiser) येथील ओसवाल परिसरात (Oswal Area) हे बॅनर लावण्यात आले होते. याच बॅनरवर अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या फोटोला काळं (Blackened) फासण्यात आले आहे. पालघरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच या बॅनरवरील अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनसेमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) पालघर मनसेतील वाद चव्हाट्यावर आला होता. पालघरची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे होती, पण त्यांनी निवडणुकीत नीट काम केले नसल्याचा आरोप करत पालघरच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच मनसेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे (Sameer More) यांनी मधील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. पण नंतर त्यांनी मनसे पक्षनेत्यांच्या विनंतीवरुन पुन्हा मनसेत प्रवेश केला होता.

मनसेच्या मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना

मनसेच्या मुंबईत होणाऱ्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यात इगतपुरी तालुक्यातून हजारो मनसैनिक रवाना झाले आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील पुढील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद या सर्व निवडणुका मनसेच्या वतीने लढवण्यात येणार असुन आता जनता महायुती सरकारला वैतागली आहे असे प्रतिपादन मनसेचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी व्यक्त केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...