Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र...तर मराठी पंतप्रधान करून दाखवा; भाजपच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

…तर मराठी पंतप्रधान करून दाखवा; भाजपच्या टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

दीपावली सणाच्या निमित्त दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे आयोजित केलेल्या दीपोत्सवातील कलाकारांच्या उपस्थितीवरून टीका करणाऱ्या भाजपला (BJP) मनसेने (MNS) जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपला मराठीबद्दल एवढेच प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. निदान बोलण्याची हिंमत तरी दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) भाजपला दिले. दिवाळीनिमित्त संकूचित बुद्धी असलेल्या लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडावा, असा जोरदार टोलाही त्यांनी भाजपला लगावला…

- Advertisement -

Maharashtra Politics : शरद पवार लवकरच भाजपसोबत जाणार; ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेचा दिपोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे. या दिपोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर व सलीम खान यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशीष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मराठी कलाकारांचा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुंबईत एक दिपोत्सव सलिम-जावेद यांच्या उपस्थितीत सुरु झाला, तर नमो उत्सव मराठी कलावंतासोबत सुरु होतोय… अशा शब्दात शेलार यांनी मनसेला डिवचले होते. त्याला संदीप देशपांडे यांनी आज प्रत्युत्तर दिले.

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे फलक
फाडले; जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर आरोप, म्हणाले…

आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपचे मराठी प्रेम हे पुतना मावशीचे आहे. एवढेच मराठीबद्दल प्रेम असेल तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा, असे आव्हान देत मराठी कलाकारांवर अन्याय झाल्यावर पाठिशी कोण उभे राहते हे महाराष्ट्राला माहित आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी शेलारांना सुनावले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी खोटी तक्रार; फिर्यादी विरोधात निवेदन

- Advertisment -

ताज्या बातम्या