Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर तिहेरी हत्याकांड : ‘त्या’ साधूंकडे होते सहा लाख रुपये

पालघर तिहेरी हत्याकांड : ‘त्या’ साधूंकडे होते सहा लाख रुपये

पालघर | राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा पसरल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील दोन साधूंसह त्यांच्या चालकाची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या साधुंकडे गाडीत सहा लाख रुपये होते अशी माहिती त्यांच्या नातलगांनी केली आहे. सुरत येथे ते अंत्यसंस्कारासाठी जात होते. अंत्यसंस्कारासाठी ते पैसे घेऊन चालले होते असे समजते.

अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दाभाडी – खानवेल मार्गावर दोन साधू आणि त्यांच्या चालकाची चोर असल्याच्या गैरसमजातून  निर्घुण हत्या केल्याची घटना घडली. या ठिकाणाहून जाणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी कासा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम घेत जंगलात आणि अन्य ठिकाणी पळून जात असलेल्या ११० संशयितांना  ताब्यात घेतले आहे.

जमावाने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला असून जमाव किती प्रक्षुब्ध झाला होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यामातून दिसून आले. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर करत ही परिस्थिती सर्वांच्या समोर आणली होती.

दरम्यान, साधूंकडे सहा लाख रुपये गाडीत होते तर ते सुरत येथे एका साधूंच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. अंत्यसंस्काराला खर्च म्हणून ते सोबत पैसे घेऊन चालले होते असे वृत्त आहे. तर त्या पैशांचे काय झाले, कुठे गेले याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पालघर हत्याकांडाप्रकरणी १०१ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य

- Advertisment -

ताज्या बातम्या