Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनशाहरुखनं 'मन्नत'मध्ये जेवणासाठी केलं 'या' मॉडेलला आमंत्रित; पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

शाहरुखनं ‘मन्नत’मध्ये जेवणासाठी केलं ‘या’ मॉडेलला आमंत्रित; पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. शाहरुखच्या मन्नत (Mannat) या घरामधील पार्टीचे किस्से अनेक सेलिब्रिटी विविध मुलाखतींमध्ये शेअर करत असतात. शाहरुख हा घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतो? हे अनेक सेलिब्रिटींनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

- Advertisement -

नुकतीच ही उत्तम संधी मॉडेल नवप्रीत कौरला (NavpreetKaur) मिळाली, जिने शाहरुख खानच्या घरी जाण्याचा आणि कुटुंबियांना भेटण्याचा तिचा अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे. शाहरुखसोबतचा सेल्फी शेअर करताना तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.नवप्रीत म्हणते की, ‘शाहरुखला भेटणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. नवप्रीतने मन्नतमध्ये तिला कशी वागणूक मिळाली ते सांगितलं.

Sharad Pawar : शरद पवारांचा ‘त्या’ विधानावरून यू टर्न? म्हणाले, माझ्या वक्तव्याचा…

‘मी स्वतःला वचन दिले आहे की मी हे फोटो पोस्ट करणार नाही, परंतु माझ्या मन्नतमधील या आठवणी खूप मौल्यवान आहे, त्यामुळे मी हे फोटो शेअर केले. किंग खाननं माझ्यासाठी पिझ्झा बनवला. तो व्हेज होता. कारण मी फक्त व्हेज खाते. मी शाहरुखच्या घरी असताना, मला वाटत होते की, मी स्वप्न पाहत आहे आणि लवकरच कोणीतरी मला जागे करणार आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्यासमोर घाबरायचे नव्हते. त्याच्यासोबत डायनिंग टेबलवर बसल्यानंतर मी खूप एक्सायटेड झाले. त्याचे कुटुंब आणि पूजा गप्पा मारत असताना. मी वॉशरूमला गेले. वॉशरुमला जाण्यासाठी मी उठले तेव्हा तो त्याच्या खुर्चीवरून उठला आणि मला वॉशरूमच्या दारापर्यंत घेऊन गेला.’

“जे आमच्याबरोबर…”; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

नवप्रीतने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, ‘गौरी खान देखील खुप चांगली आहे. अबराम माझा नवीन चांगला मित्र बनला आहे. मला माहित आहे की काही दिवसांनी त्याला मी लक्षात राहणार नाही. आर्यन देखील एक जेंटलमन आहे. तो रागावलेला दिसतो आणि सुहाना खूप क्यूट आहे. पूजा स्वत: मध्ये आयकॉनिक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी शाहरुख खानच्या घरी मन्नतला गेले होते. आत्तापर्यंत ते मला स्वप्नवत वाटत होतं.’

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...