मोखाडा l Mokhada (वार्ताहर)
आमले येथिल मनीषा दोरे २५ वर्ष या गर्भवती महिलेचा व बालकाचा आरोग्य सुविधेअभावी व रुग्णवाहिका वेळेवर न पोहचल्यामुळे मृत्यु झाला.
यासाठी आज जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कुसुम झोले जिल्हा परीषद सदस्या, मिलिंद झोले भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष व ग्रामपंचायत सूर्यमाळ यांनी आपल्या पत्राद्वारे झालेल्या घटनेची माहिती दिली व तात्काळ मोखाडा तालुक्यातील खोडाळा आरोग्य केंद्राला १०२ -१०८ या रूग्णवाहिकेची व्यवस्था करावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाही.
डॉ. गूरसळ जिल्हाधिकारी पालघर यांनी तात्काळ दखल घेऊन रुग्णांना आरोग्य सेवा सुरळीत चालेल व रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, देवराम कडू, रमेश राथड, सरपंच सूर्यमाळ, आनंद शिंदे उपसरपंच किनिस्ते, शिवराम हमरे, जगन हमरे, शांताराम किरकिरे, पांडुरंग वारे, सोमनाथ किरकिरे पोलिस पाटील, संतोष किरकिरे उपस्थित होते.