Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदेशदूतचा दणका; विमानतळनजीकचे गतिरोधक दुरुस्तीस मिळणार मुहूर्त

देशदूतचा दणका; विमानतळनजीकचे गतिरोधक दुरुस्तीस मिळणार मुहूर्त

जानोरी । वार्ताहर Janori

विमानतळ (airport) – दहावा मैल रस्त्यावर गतिरोधक (speed breaker) धोकादायक या मथळ्याखाली दैनिक देशदूत (dainik deshdoot) ने सविस्तर बातमी प्रसिद्ध करताच सदर रस्त्यावरील चुका निदर्शनास आणून दिल्याबरोबर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत त्यात दुरूस्तीला (road repair) सुरूवात करून अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले.

- Advertisement -

नाशिक विमानतळ (nashik airport) म्हटलं तर अवघ्या जिल्ह्याला त्याचा अभिमानान वाटतो. सध्या महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी अधिकाधिक विमानांची उड्डाणे होण्यासाठी हालचाली गतिमान सुरू होत असून त्याला यशदेखील मिळत आहे ही महत्त्वाची बाब असली तरीही विमानतळ ते दहावा मैल रस्त्यावरील बांधकाम विभागाकडून (construction department) झालेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असुन जिवितहानी देखील झाली असतांनाच सार्वजनिक बांधकाम विभागाने (department of public works) यात लवकरात लवकर सुधारणा करणे आवश्यक आहे.

याबाबत सविस्तर वृत्त दैनिक देशदूतने प्रसिद्ध करताच संबंधित विभागाने या बातमीची दखल घेत अनावश्यक गतिरोधक काढत आवश्यक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येणार असल्याचे देशदूतशी बोलतांना सांगितले. नको त्या ठिकाणी गतिरोधक, नको त्या ठिकाणी रस्त्यावरील दूभाजकाला रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवून वयक्तिक संबंध जोपासण्यासाठी केलेला मार्ग, विमानतळ रस्त्यावरील अतिक्रमणे हे वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरत असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मोठा अनर्थ घडण्याची वाट न बघता संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष केंद्रित करून हा रस्ता नागरिकांसाठी पुर्ण सुरक्षित होईल यापध्दतीने विचार करून चुकांची दुरुस्ती करून सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मागणी केली असतानाच संबंधित विभागाने तात्काळ दखल घेणार असून सदर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

विमानतळ ते दहावा मैल हा महत्त्वाचा रस्ता असून न संबंधित विभागाकडून राहिलेल्या थोड्या कामामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी यावर दैनिक देशदूत ने आवाज उठवत सविस्तर बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल व बातमीची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेतल्याबद्दल मी नागरीकांच्या वतीने आभार मानतो.

– गणेश तिडके, माजी उपसरपंच जानोरी

या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी काही गोष्टी अपुर्ण राहिल्या असून आवश्यक तिथे गतिरोधक तात्काळ बसविण्यात येतील. अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.

– धनंजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग, दिंडोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या