Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टाने जामीन नाकारला

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! कोर्टाने जामीन नाकारला

मुंबई | Mumbai

मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यालयातील विषेश पीएमएलए न्यायालायात आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी याबाबत निर्णय दिला.

- Advertisement -

अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे मलिक यांची जामिनासाठी धावाधाव गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर, नवाब मलिकांनाही जामीन मिळेल असा अंदाज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. पण आज झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांना जामीन नाकारण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या