Sunday, May 19, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

जिल्ह्यात करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात २ हजार ५२६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले. तर २ हजार ९१९ रूग्णांनी करोनावर मात केली. आज जिल्ह्यातील नव्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे…

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २ हजार ५२६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) १ हजार ६६३, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ७३४, मालेगाव (Malegaon) मनपा विभागात ५३ तर, जिल्हाबाह्य ७६ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दोन करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोन्ही रुग्ण नाशिक मनपा विभागातील होते. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७८२ इतकी आहे.

दरम्यान, करोना रुग्णांचा आलेख वाढत असल्याने नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. करोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या