Thursday, May 2, 2024
HomeनाशिकMHT CET 2021 : पहिल्या दिवशी अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

MHT CET 2021 : पहिल्या दिवशी अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सामायिक परीक्षा कक्ष (common entrance test) यांच्यामार्फत अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) व कृषी तंत्रज्ञानासाठी (Agricultural technology) सीईटी २०२१ परीक्षा (CET 2021) घेण्यात येत आहे…

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एकूण १३ केंद्रांवर आजपासून सकाळ व दुपार सत्रात परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात दि.२० सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत पीसीएम (PCM) ग्रुपकरिता परीक्षा होत आहे.

पहिल्या दिवशी दोन्ही सत्रात मिळून २ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात पहिल्या सत्रात १ हजार ३३४ पैकी १ हजार २१५ विद्यार्थी उपस्थित होते. ११९ विद्यार्थी गैरहजर राहिले.

बापरे! दहा फुटी सापाने केला सिन्नर ते देवळाली कार प्रवास

दुसऱ्या सत्रात १ हजार ३७० पैकी १ हजार २४३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर १२७ जण यावेळी गैरहजर होते. दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर पीसीबी (PCB) ग्रुपकरिता परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.

आणखीही ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथे

- Advertisment -

ताज्या बातम्या