Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात आढळले दोन हजाराहून अधिक करोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आढळले दोन हजाराहून अधिक करोना पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात २ हजार २०४ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले. तर १ हजार ४८४ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २ हजार २०४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) १ हजार ४३५, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात ६६७, मालेगाव (Malegaon) मनपा विभागात ४३ तर, जिल्हाबाह्य ५९ रुग्णांची नोंद झाली आहे.

Video : 14 किमी अंतर 4 तासांत पोहणाऱ्या नाशिकच्या स्वयंमला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

जिल्ह्यात आज एक करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा रुग्ण नाशिक ग्रामीण विभागातील होता. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७८३ इतकी आहे.

दरम्यान, करोना रुग्णांचा आलेख वाढत असल्याने नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. करोना त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या