Monday, July 15, 2024
Homeनाशिकसासूला वाचवण्यासाठी गेलेल्या सुनेचाही विहिरीत पडून मृत्यू

सासूला वाचवण्यासाठी गेलेल्या सुनेचाही विहिरीत पडून मृत्यू

मनमाड : Manmad

- Advertisement -

येथील पांडुरंग नगर भागात शेतातील विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन महिलांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मनमाड (manmad) पांडुरंगनगरमधील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गयाबाई अशोक पवार (वय ५०) पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी मनिषा पवार यांनी आरडाओड केली. परंतु जवळपास कोणीच नव्हते. यामुळे त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या मनीषा सचिन पवार (२६) तोल जाऊन विहिरीत पडल्या.

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी व आईचे निधन

सचिन पवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता. मात्र, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सचिन यांनी आई आणि पत्नीला गमवले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत मनीषा हिला एक आठ वर्षाचा मुलगा व सहा व चार वर्षांच्या दोन मुली आहे.तिच्या निधनाने तीन बालकांचे मातृछत्र हरवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या