Friday, May 3, 2024
HomeUncategorizedMouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न बंधनात अडकली आहे.

त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

- Advertisement -

त्यानंतर मौनीचे चाहते तिच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा करत होते.

आता मौनीचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मौनी आणि सुरज यांचं लग्न मल्याळम परंपरेने झालं आहे.

त्यांच्या लग्नातील पहिला फोटो मौनीचा जवळचा मित्र अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अर्जुनने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मौनी आणि सुरज मंडपात उभे असल्याचे दिसत आहे. मौनी यात अतिशय सुंदर दिसत आहे.

मौनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, गोल्डन कलरचे दागिने आणि केसांमध्ये गजरा या लूकमध्ये दिसत आहे.

मौनीचा पती सूरज हा सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या