Thursday, May 2, 2024
Homeजळगावशिक्षक भारती संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

शिक्षक भारती संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

चाळीसगाव । प्रतिनिधी

शिक्षक भारती संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी नुकतेच राज्यव्यापी आदोलन करण्यात आले, त्या अंनुषगाने येथील पदाधिकार्‍यांनी देखील दि,3 रोजी आदोलन करत, मागण्याचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना दिली.

- Advertisement -

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाइलऐवजी टेलिव्हिजन व रेडिओचा वापर सुरु करा, ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्या, (टॅबलेट, ऍन्ड्रॉइड फोन) विनाअनुदानित व रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्या, कोविड ड्युटीवर मरण पावलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना 50 लाखांची मदत तातडीने द्या, कोविड ड्युटीवर कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्या, कोविड ड्युटी करणाऱया सर्व शिक्षक शिक्षकेतरांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर विद्यार्थाना शिकवण्यासाठी करा, कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घ्या, कोविड ड्युटी करणार्‍या शिक्षक शिक्षकेतरांना प्रोत्साहन भत्ता द्या व विशेष वेतनवाढ लागू करा, शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्या, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सँनिटायझेशन करा. शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी सर्व साहित्य खरेदीसाठी विशेष अनुदान दया, कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अ‍ॅक्टिव्हिटी बुक द्या, कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळेत विनाअट प्रवेश द्या, कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नका, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतरांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नका आदि मागण्यांचे निवेदन तहसिलदार अमोल मोरे व गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.नितीन बाविस्कर, अजिज खाटीक, प्राचार्य अभिजित खलाणे, निलेश पाटील, हेमंत देवरे, विनोद सपकाळे आदि शिक्षक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या